Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

खर सुख, आनंद आणि मजा.

ट्रान्स्फरेबल जाॅब ही खर तरं नियोक्त्याच्या           ( Employer)  पैशाने देशाटन करायची संधीच असते. आपली बदली  अशा ठिकाणी होते. तिथे  जाऊनही आपण  रहातो. जिथे कधी जाण्याचाही विचार केला नसला. आपण शक्यतो पर्यटनाला देव दर्शन, हिल स्टेशन किंवा प्रेक्षणिय स्थळालाच भेट देतो. पण आपली  ट्रान्स्फर होते.  तिथे वरील म्हटल्याप्रमाणे  खुप प्रसिध्द असे काहीच नसतं. पण हे पर्यटनापेक्षा अधिक मनोरंजक असतं. अर्थात या गोष्टीकडे अर्थात बदली कडे सकारात्मक पध्दतीने पहाण्याचा आपला स्वभावही असावा लागतो. 
लहान असतांना वडिलाच्या नोकरीमुळे बरेच फिरलो. माझे 15 वर्षाचे शिक्षण 6 ठिकाणी झालं. त्यामुळे कसं 2-3 वर्ष एका ठिकाणी राहिलो की बेचैन व्हायचो.  वाटायचं आता चेज हवा . क्लर्कच असतो तर ट्रान्सफर झाली नसती. पण वडिल ऑफिसर होते. त्यामुळे रक्तातच ऑफिसरकी होती. त्यामुळे ट्रान्सफर त्रासदायक वाटली नाही. अर्थात सौ चे सहकार्य ही जमेची आणि सकारात्मक गोष्ट होती. संसार म्हटलं की दोघांमध्ये एकवाक्यता असणे गरजेचे असते. 
प्रमोशनवर माझी राजुरा ह्या चंद्रपुर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी बदली झाली. बल्लारपुर या महाराष्ट्रातील दिल्ली-चेन्नई रेल्वे रूट चे शेवटचे आणि मोठे स्टेशन.येथून राजुरा 10 कि.मी वर तेव्हाच्या आंध्र प्रदेश पासून जवळ म्हणजे 35 कि.मी वर. आम्ही शिफ्टींग करणार त्याच्या दोन दिवस आधी. जवळच असलेले विरूर येथील पोलिस स्टेशन पेटवून देण्याचा नक्षलवाद्यांकडून प्रयत्न झाला होता. बरेच जण शिफ्टींग करू नका असा सल्ला देत होते.कुठल्याही गोष्टीची भिती बाळगणे हा माणसाचा खुप मोठा दुर्गुण ज्यामुळे माणसाचे फार नुकसान होते. वास्तव काय हे जाणून घ्यायला हवे ना. आम्ही ठरल्याप्रमाणे शिफ्टीग केल. राजुरा एक छान गांव होतं. मोठ्या शहरासारखा गजबजाट नव्हता पण सुविधा सगळ्यांच होत्या. कारण वेस्टर्न कोल्डफिल्ड च्या कोळसा खाणी असल्याने इतर प्रांतातील लोकांची संख्या बरीच होती. राजुरा इथून दक्षिणेकडे निघालो की लगेच जंगल होतं. लोकवस्ती नव्हती असं नाही. मधूनमधून छोटी छोटी गांव होती. याच असिफाबाद रोडवर 7-8 कि मी आत जंगलात जोगापुर येथे मारूतीचे मंदिर होते. जागृत देवस्थान समजले जात असे. मार्गशिष महिन्यात इथे मोठी यात्रा भरायची . खुप गर्दी असायची. जवळपासच्या जिल्ह्यातून लोक येत असतं दर्शनाला. पहिली तीन वर्ष तर माझ्याकडे स्वतःची कार नसल्याने मुलांच्या शाळेच्या आटो काकांच्या डग्गा आटोतूनच गेलो. घर मालकांच्या पत्नी ,मुलगा अविनाश आणि दोन मुली संगीता आणि सुनिताही आमच्या सोबत असायच्या. यात्रेत बरीच दुकाने लागत असतं. माझा धाकटा मुलगा सलील 6-7 वर्षाचा असल्याने त्याला खुप मजा यायची. एक तर त्याच्या वयाला साजेशी खेळणी तिथे मिळायची. 5-10 रूपयाच्या खेळण्यांनी त्याला खुप आनंद होत असे. असा निख्खळ आनंद मुलांच्या चेहर्यावरचा अनुभवणे यासारखे दुसरे सुख नाही. मोठा सुनिल बॅट बाॅल घेऊन येत असे. कारण मित्रांचे आधीच ठरलेले असे कि या रविवारी जोगापुरला जायचं. आम्हाला माहित नसायचं पण सारे काही प्लॅन्ड असायचं. मला खुप कौतुक वाटायचं. मॅनेजमेंट चे कुठलेही शिक्षण नसतांना हे सर्व 9-10 वर्षाचे मुल करू शकतात. खर तर माझं स्पष्ट मत मुलांना संस्कार शिकवावे लागत नाहीत. अन शिस्त ही लावल्याने लागत नाही आणि संस्कारही  घडत नाहीत. मुल पालकांकडून सार काही शिकतात. म्हणून त्यांच्या  संस्कारक्षम वयांत त्यांच्या  समोर कसं वागायचं आणि काय बोलायचं ह्याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. 
थोड विषयांतर झाल्यासारखे  वाटेल   पण ते विषयाला धरूनच आहे हे लक्षात  येईल.  तर 2-3 तास त्या मंदिराच्या सान्निध्यात मजेत जायचे. जेवणाचे   डबेही आणलेले असायचे , सह भोजनाचा आनंद घ्यायचा. बॅकेतील सहकारी फॅमिली सोबत आलेले असायचं. त्यांच्या सोबत अवांतर गप्पा होत असतं. गावातले जवळपासच्या खेड्यातले ओळखीचे लोक भेटायचं. वेळ कसा जायचा कळायचा नाही आणि आपण जंगलात आहोत हे विसरायला व्हायचे. असा हा अनुभव माझी बदली राजुर्यास झाली नसती तर घेता आला नसता कारण मी तिथे मुद्दाम काही गेलोच नसतो. 
राजुरा येथील आणखी एक अनुभव निश्चितपणे सांगण्या सारखा आहे. बल्लारपुर आणि राजुरा या गावांमधून वर्धा नदी वहाते. वर्धा हे वरदा असावे. कारण या नदीने 3-4 जिल्ह्यातील शेतीला अभयदान दिले आहे. मध्य प्रदेशांतील सातपुडा पर्वत रांगेत बैतुल जवळ उगम पावलेली . आधी अमरावती वर्धा या दोन जिल्ह्याची, मग वर्धा यवतमाळ या दोन जिल्ह्यांची आणि नंतर यवतमाळ चंद्रपुर या दोन जिल्ह्यांची सीमा होते. पुर्व महाराष्ट्रातील ही एक प्रमुख नदी आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील वाढा येथे पैनगंगा ही नदी वर्धेला येऊन मिळते. त्यानंतर ही नदी राजुरा येथे येत असल्याने दर पावसाळ्यांत ती एखादं दुसरा पुर काढतेच असं तिथले लोक म्हणत म्हणजे पुर यायचे. असाच एकदा ह्या नदीला पुर आला होता. ते आमचे तेथील पहिले वर्ष . आम्हाला विशेष माहिती नव्हती. सुनिल नदी पलिकडच्या बल्लारपुरच्या शाळेत जात असल्याने त्याने न्युज दिली की उद्या बहुतेक पुर येईल आणि पुला वरून पाणी जाईल आणि रस्ता बंद होईल. पुल पाण्याखाली गेला की राजुर्याचा महाराष्ट्राशी संपर्क तुटायचा. पलीकडे जाण्यासाठी रेल्वे हेच साधन. लांब पल्याच्या काही गाड्या राजुरा माणिकगढ या छोट्या स्टेशनवर देखिल थांबत असतं. पुराचे पाणी राजुरा येथून 1 कि मी. दूरवरील पेट्रोल पंपाजवळ येऊन पोहोचले असल्याचे कळले.संगीता म्हणाली तुम्ही जात नाही का पूर पाहिला ?. मला वाटल पूर काय पहायचाय. पण संगीताने आग्रह केला म्हणून आम्ही चौघेही पूर  पहायला गेलो. तर द्दष्य पहाण्यासारखेच होते. जिकडे नजर गेली तिकडे पाणीच पाणी दिसत होते. अगदी अथांग सागराचे रूप आले होते नदीला. पाणी हे जीवन आहे पण त्याचे रूद्र रूप फार भयावह असत. पण इथे पाणी तुंबलेले असल्याने शांत होते. खुप गर्दी लोटली होती. मला छोट्या व्यवसायिकांच्या व्यवसायिकतेचे  कौतुक वाटले . तिथे  गर्दीत  लहान मुल येतील म्हणून फुगे वाल्यानी आपली हातगाडी लावली होती. खारे दाणे. कणसं, पाॅपकाॅर्न ,भेळच्या गाड्याही लागल्या होत्या. त्या ठिकाणाला चौपाटीच रूप यायचं. गावातून नदी वहात नसल्याने गांवाला धोका नव्हता. त्यामुळे लोक नदीचा पुर एन्जाॅय करित असतं. वाटायचं किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेतात हे लोक. आम्ही ही याचा आनंद घेतला. अर्थात नंतर माझी विहीरगांवला जेव्हा बदली झाली. तेथील आठही गावातील शेतकर्याच्या शेत जमीनी पाण्याखाली जाऊन त्यांचे अतोनात नुकसान झालेले ही मी पाहिले. प्रत्येक गोष्टीला नाण्यासारख्या दोन बाजू असतात.  नदीचा पूर शिकवून गेला ही गोष्द .
पण तो पेट्रोल पंपाजवळील नदीचा पुर आणि तेथील चौपाटी हा वेगळाच अनुभव. असा अनुभव पुढे कुठेही मिळाला नाही. 
नंतर मोठ मोठ्या शहरांत राहिल्यावर जास्त जाणवलं  कि शहरातील करमणुकीची साधनं जसे माॅल , पिकनिक स्पाॅट, मोटेल, हाॅटेल  यांत करमणूक तर विकत घेता येते. पण मजा, आनंद आणि सुख हे विकत घेता येत नाही. ते अनुभवावे लागते. शहरात ते मिळत नाही. हेच खर.


 

Comments

  1. अतिशय सुंदर ब्लॉग

    ReplyDelete
  2. खूप छान अनुभव कथन सर. यातल्या दोन तीन गोष्टींचा उल्लेख पुन्हा करायला आवडेल. महाराष्ट्रीय माणूस, त्यातल्या त्यात बँकेत नोकरी करणारा, बदलीला घाबरतो ही वस्तुस्थिती आहे. बँकेत आम्ही सहज प्रमोशनची परीक्षा पास होऊ शकतो पण आम्हाला त्या वाटेला जायचे नाही म्हणणारे जे असायचे ते एक तर क्वालिफाय न होऊ शकणारे किंवा बदलीची भीती वाटणारे. आपण व सौ वहिनी बदलीकडे सकारात्मकतेने बघणारे असल्यामुळे जेथे जेथे पोस्टिंग झाले तेथे खूप समाधानाने आणि सक्रीयतेने काम केले आणि आनंद लुटला. आपण मुलांना संस्कार शिकवता येत नाहीत, आपल्या वागणुकीतून त्यांच्या मनावर बिंबवायला हवेत असे म्हटले आहे ते खरेच आहे. शहरात मॉल, सिनेमा थिएटर, पिकनिक पॉईंट्स, हॉटेल अशी करमणुकीची साधने असली तरी खेड्यात जो आनंद लुटता येतो तो शहरात नाही असे म्हटले आहे ते अक्षरशः खरे आहे. खूप छान लिहिले आहे आपण. Please keep it up.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...