ब्लॉग नं. 2026/ 107. दिनांक: 17 एप्रिल, 2026. मित्रांनो , डोळ्यांकडे दुर्लक्ष करताय ? ' या ' 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात! आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये लाभली आहेत , त्यापैकी ' दृष्टी ' हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण दुर्दैवाने , जोपर्यंत डोळ्यांत काही मोठी समस्या जाणवत नाही , तोपर्यंत आपण त्याकडे लक्ष देत नाही. कामाचा ताण , वाढते वय किंवा स्क्रीनचा अतिवापर समजून,आपण डोळ्यांच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो.आजच्या ब्लॉगमध्ये , याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: जागतिक आकडेवारीनुसार , सुमारे 90 टक्क्यांहून अधिक दृष्टीदोष,टाळता येण्यासारखे असतात. तरीही लाखो लोक वेळेवर उपचार न मिळाल्याने , अंधत्वाचा सामना करत आहेत.ऑर्बिस (इंडिया) चे कंट्री डायरेक्टर डॉ. ऋषी राज बोरा यांच्या मते , डोळ्यांनी दिलेले काही ' सायलेंट ' संकेत ओळखणे,ही काळाची गरज आहे.चला जाणून घेऊया डोळ्यांची अशी 5 लक्षणे , जी भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल असू शकतात: 1. दृष्टी वार...
ब्लॉग नं. 2026/101. दिनांक: 11 एप्रिल , 2026. मित्रांनो , काय होतं,जेव्हा आपण समोरच्याचं मन राखण्यासाठी , स्वतःची इच्छा नसतानाही प्रत्येक गोष्टीला ' हो ' म्हणतो ? आपण समोरच्याला तर खुश करतो , पण स्वतःच्या मनावर मात्र तणावाचं ओझं वाढवत नेतो.तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतंय का ? स्वतःसाठी वेळच मिळत नाहीये का ? याचं मूळ कारण कदाचित तुमच्या ' हो ' म्हणण्याच्या सवयीत दडलं असू शकतं. आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया की , ' नाही ' म्हणणं मानसिक आरोग्यासाठी किती गरजेचं आहे. सविस्तर: मानसशास्त्रज्ञांच्या मते , प्रत्येक गोष्टीला ' हो ' म्हणणारी माणसे लवकर ' बर्नआऊट ' (Burnout) होतात. त्यांना मानसिक थकवा आणि चिडचिड होण्याचे प्रमाण अधिक असते.मनाचे आरोग्य जपण्यासाठी, ' नाही ' म्हणायला शिकणे ही एक कला आहे. ती कशी आत्मसात करायची , ते पाहूया: 1. स्वतःची मर्यादा ओळखा: आपण सुपरमॅन नाही आहोत हे मान्य करा. एकाच वेळी ऑफिसचे काम , घरच्या जबाबदाऱ्या आणि मित्रांचे आग्रह पूर्ण करणे अशक्य आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मर्यादा संपली आहे , तेव्हा...