ब्लॉग नं. 2026/0 71. दिनांक: 12 मार्च , 2026 . मित्रांनो , वय वाढतंय… पण शक्ती का कमी होतेय ? आपण नियमित चालता , व्यायाम करता , “ हेल्दी” खाता , सप्लिमेंट्सही घेता… तरीही शरीरात सतत अशक्तपणा जाणवतो ? खुर्चीतून उठताना हातांचा आधार घ्यावा लागतो ? जिने चढताना दम लागतो ? तर कदाचित हे फक्त “वय” नाही. ही असू शकते सार्कोपेनिया — वयानुसार होणारी स्नायूंची झपाट्याने घट.ज्या बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत,आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर 🧬 सार्कोपेनिया म्हणजे नेमकं काय ? सार्कोपेनिया म्हणजे, वयानुसार स्नायूंचा आकार आणि ताकद कमी होणे. साठीनंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने होते.स्नायूंचे सूक्ष्म तंतू तुटतात आणि योग्य पोषण नसेल तर ते पुन्हा मजबूत होत नाहीत.याचा परिणाम म्हणजे, खुर्चीतून उठताना त्रास, सामान उचलताना कमजोरी, संतुलन बिघडणे आणि पडण्याचा धोका वाढणे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे — ही प्रक्रिया थांबवता येते , आणि काही प्रमाणात उलटवता ( Reverse ) देखील येते. 🚫 सकाळी टाळावेत असे 5 पदार्थ: 1️ ⃣ पांढरी ब्रेड: पांढरी ब्रेड ( White Bread ) शरीरा...
ब्लॉग नं. 2026/0 64. दिनांक: 5 मार्च , 2026 . मित्रांनो , ज्येष्ठ नागरिक आणि फ्रॅक्चरचा धोका वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत जातात. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हाडांची घनता कमी होणे (ऑस्टिओपोरोसिस) . त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. यासाठी एक साधं सूत्र लक्षात ठेवायला हवं . या विषयावर आहे, आजचा ब्लॉग. सविस्तर: साठी नंतर हाडांशी संबंधित रोग होणे हे स्वाभाविक लक्षण आहे.मग स्त्री असो वा पुरुष, हाडांची काळजी घेण्यात येत नाही. फक्त त्यांचा पुरेपूर वापर केला जातो. त्यातच स्नायू मजबूत रहात नाही आणि त्यांच्या मजबूतीसाठी आपल्याकडून काही केले जात नाही.त्यामुळे पडण्याचे प्रमाण वाढते.आणि पडण्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढतो. 📌 फ्रॅक्चरचा धोका: हाडांची घनता कमी असेल तर,अगदी छोट्या धक्क्यानेही फ्रॅक्चर होऊ शकते. त्यामुळे केवळ तपासण्या करून उपयोग नाह...