ब्लॉग नं. 2026/069 दिनांकः 10 मार्च , 2026. मित्रांनो , मधुमेहाबद्दलचे पाच मोठे गैरसमज आणि सत्य यावर्षी 14 नोव्हेंबरला,साजरा होणाऱ्या जागतिक मधुमेह दिनाची थीम आहे , “मधुमेह आणि कल्याण”. या थीमचा मुख्य संदेश असा आहे की,मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ रक्तातील साखरेची पातळी तपासण्यापुरते मर्यादित नसून , संतुलित , निरोगी आणि शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारणे तितकेच महत्त्वाचे आहे.आजच्या ब्लॉग मध्ये हे सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: आज जगभरात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.तरीही या आजाराबद्दल अनेक मिथक (गैरसमज) समाजात खोलवर रुजलेले आहेत.या गैरसमजांमुळे अनेक वेळा रुग्ण गोंधळून जातात , चुकीचे निर्णय घेतात किंवा योग्य उपचार सुरू करण्यास उशीर करतात. एंडोक्राइनोलॉजीचे तज्ज्ञ डॉ. हिमांशू शर्मा यांनी मधुमेहाबद्दलचे काही सामान्य गैरसमज स्पष्ट केले आहेत.चला , त्यातील पाच प्रमुख मिथक आणि त्यामागील सत्य समजून घेऊया. 1. गैरसमज: साखर खाल्ल्यानेच मधुमेह होतो: अनेकांना वाटते की,साखर खाल्ल्यामुळेच मधुमेह होतो.परंतु प्रत्यक्षात हे पूर्ण सत्य नाही. विशेषतः टाइप 2 मधुमेह,हा अनेक घटक...
ब्लॉग नं. 2026/0 63. दिनांक: 4 मार्च , 2026 . मित्रांनो , थायरॉईडमुळे वाढते वजन,ठेवा आहाराने नियंत्रण अचानक वजन वाढू लागले की,डॉक्टर सर्वप्रथम थायरॉईड तपासणी करण्याचा सल्ला देतात. कारण शरीरातील चयापचय क्रियेवर ( Metabolism) नियंत्रण ठेवणारी ही महत्त्वाची ग्रंथी आहे.आधुनिक धकाधकीच्या आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे,विशेषतः महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पण आनंदाची गोष्ट म्हणजे योग्य आहार , व्यायाम आणि वेळेवर तपासणी यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येते. आज या विषयावर जाणून घेऊ. सविस्तर: 🦋 थायरॉईड म्हणजे नेमकं काय ? थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची लहान ग्रंथी असून ती गळ्याच्या खालच्या भागात असते. तिचे मुख्य कार्य म्हणजे, शरीराचा चयापचय नियंत्रित करणे, ऊर्जा निर्मितीवर परिणाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, हार्मोन्सचे संतुलन राखणे ही आहेत. ⚠️ थायरॉईडची लक्षणे ओळखा: खालील लक्षणे दिसत असतील तर,तपासणी करणे आवश्यक जसे की,बद्धकोष्ठता, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, हात-पाय थंड पडणे, त्वचा कोरडी...