ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
ब्लॉग नं: 2025/331. दिनांक: 25 नोव्हेंबर,2025. मित्रांनो, सोललेले बदाम विरुद्ध सालीसह बदाम: चविष्ट , कुरकुरीत आणि पोषक मूल्यांनी भरलेले बदाम,नेहमीच लोकांना खावेसे वाटतात.आणि एक आरोग्यदायी ड्राय फ्रूट म्हणून ओळखले जातात. पण एक प्रश्न अनेक वर्षांपासून लोकांच्या मनांत आहे की, बदाम त्वचेसह खावेत का की सोलून खावेत ? सालासहित की विनासालीचा बदाम जास्त फायदेशीर आहे ? या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत. सविस्तर: सालासहित की विनासालीचा बदाम जास्त फायदेशीर आहे ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बदामांचे पोषण , त्यातील अँटिऑक्सिडंट्स , फायबर , पचन क्षमता आणि एकूण आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. बदामाला त्वचा असते का ? ती तुमच्या आरोग्यासाठी किती फायद्याची ? आपल्याला माहित आहे की,बदामांवर एक पातळ तपकिरी त्वचा असते. ही फक्त दिसण्यासाठी नसून ती पॉलीफेनॉल्स नावाच्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते.संशोधनानुसार , सुमारे 70% अँटिऑक्सिडंट्स बदामांच्या त्वचेमध्ये आढळतात. अँटिऑक्सिडंट्स म्हणजे काय ? अँटिऑक्सिडंट्स त...