ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
ब्लॉग नं. 2025/05 7 . दिनांक: 2 6 फेब्रूवारी , 2025. मित्रांनो , कधी कधी काही गाणी खूप दिवस लक्षात रहातात.एवढेच नव्हे ते तर ती आपल्या मनावर कोरली जातात.अशी खूप आशयपूर्ण गाणी जी मनात ठसून रहातात आणि काही वेळा त्या गाण्यांशी काही आठवणी जोडल्या जातात.तरुणपणी मनुष्याच्या वाटेला असे काही प्रसंग येतात की जे एखाद्या गाण्याशी जोडले जातात.अशीच एक गोष्ट मी आज सांगणार आहे , त्या गोष्टीशी म्हणा , आठवणीशी म्हणा हे गाणे जोडले गेले आहे. सविस्तर: मी रेल्वेने नासिक रोड स्टेशनवरुन अकोल्याला येत होतो. नासिक रोडला एक वरात एका डब्यात चढली.ते सर्व एका डब्यात चढले होते.पण आतापर्यन्त नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलासोबत अगदी मोकळे पणाने बोलणारा एक तरुण मुलगा माझ्या सोबत दुसऱ्या डब्यात चढला. तो वरातीसोबत चढला नाही.अचानक एक माणूस जो ट्रांजिस्टर घेऊन बसला होता. त्याच्या रेडियोवर स्व.मुकेश यांनी गायलेले, “देवर” सिनेमातील हे गाणं लागलं.गीत आनंद बक्षी यांच, संगीत रोशन (राजेश आणि राकेश रोशन यांचे वडील) यांच आणि याचं चित्रण हे धर्मेंद्रवर करण्यात आलं होतं. ...