Skip to main content

Posts

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

लिंक हॉफमॅन बुश कोच-Linke-Hofmann-Busch (LHB)

Blog No. 2024/ 1 32 .   Date: 25 th ,June 2024 मित्रांनो,             कालच्या लोकसत्तात एक बातमी छापून आली.एलटीटी- कोचूवेली गरीबरथ एक्सप्रेसला लिंक हॉफमॅन बुश कोच   जोडले जाणार आहेत.ही बातमी मी सकाळी वाचली. पण आजकाल माझ्या ब्लॉगचे वाचकच मला सुचवित असतात की,एखाद्या विषयावर ब्लॉग लिहा.म्हणून खरं तर आजचा ब्लॉग लिहितोय,एलएचबी रेल्वे कोचेसवर.     सविस्तर:              Linke-Hofmann-Busch (LHB) कोच हा भारतीय रेल्वेचा एक प्रवासी कोच आहे,जो जर्मनीच्या Linke-Hofmann-Busch ने विकसित केला आहे. आता ज्याचे निर्माण कपूरथला , चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कोच उत्पादन युनिट्सद्वारे केले जाते.हे डबे 2000 पासून भारतीय रेल्वेच्या 1 , 676 मिमी (5 फूट 6 इंच) ब्रॉडगेज   नेटवर्कवर वापरले जात आहेत.सुरुवातीला , शताब्दी एक्स्प्रेसमध्ये वापरण्यासाठी जर्मनीतून 24 वातानुकूलित डबे आयात करण्यात आले , त्यानंतर तंत्रज्ञान हस्तांतरणानंतर, रेल्वे कोच कारखान्याने उत्पादन सुरू केले. भारतीय रे...

सेन्सोरिनरल श्रवणशक्ती कमी होणे- Sensorineural hearing loss

Blog No. 2024/ 1 31 .   Date: 24 th ,June 2024 मित्रांनो,             इतक्यात तुमच्या ऐकण्यात म्हणा वाचनात म्हणा, एक बातमी आली असेल.ती बॉलीवूडची पार्श्वगायिका अलका याज्ञिक हिला दुर्मिळ सेन्सोरिनल व्हायरल अटॅकनंतर,तिची श्रवणशक्ती कमी झाल्याचे निदान झाले आहे. काही आठवड्यांपूर्वी फ्लाइटमधून बाहेर पडल्यानंतर तिला काहीही ऐकू येत नव्हते , असे तिने मंगळवारी इंस्टाग्रामवर शेअर केले. हा नेमका आजार काय आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर:             सेन्सोरिनरल श्रवणशक्ती कमी होणे ( SNHL) हा आजार कानाच्या आतील संरचना किंवा श्रवणविषयक मज्जातंतूच्या नुकसानीमुळे होते. हे बऱ्याचदा मोठ्या आवाजामुळे , अनुवांशिक घटकांमुळे किंवा वृद्धत्वामुळे होते. आतील कानात , कोक्लीया , एक सर्पिल-आकाराचा अवयव असतो , जो म्हणजे स्टिरीओसिलिया नावाच्या लहान केसांच्या पेशी असतात . त्या पेशी श्रवण म्हणजे आपण जे ऐकतो ते मज्जातंतूद्वारे मेंदूला प्रसारित होणाऱ्या विद्युती...

या पाच गोष्टी लक्षात ठेवा.

Blog No. 2024/ 1 30 .   Date: 23 rd ,June 2024 मित्रांनो, आपल्याला बरं वाटतं नसेल तर आपण डॉक्टरकडे जात असतो.त्या वेळेस आपण त्यांना विचारलं की, मला वारंवार हा आम्ल पित्ताचा (Acidity) किंवा पोट खराब होण्याचा आजार होऊ नये,यासाठी काय करावे? डॉक्टर इतके बिझी असतात की ते म्हणतात की,सध्या होत असलेला त्रास दूर झाला की सांगतो ना.या एखाद्या वेळेस मग बोलू आपण त्याच्यावर.या वेळेस आपण प्रस्तुतचा आजार बरा होण्यावर लक्ष देऊ.अन ती पुढची वेळ कधी येतं नाही,म्हणजे पुढच्या वेळेस आपण पुनः काही त्रास झाला तरच डॉक्टरकडे जातो. डॉ डिंपल जांगडा , आयुर्वेदिक प्रशिक्षक आणि एक आतडे तज्ञ यांनी काही सामान्य गोष्टी शेअर केल्या आहेत.ज्या तुमचे डॉक्टर तुम्हाला कार्यबाहुल्यामुळे सांगू शकत नाहीत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण त्या बघू या. सविस्तर: डॉक्टर अत्यावश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देत असतात.पण यामध्ये संतुलित जीवनशैली राखणे , तणावाचे व्यवस्थापन करणे आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे यांचा समावेश नसतो.वैद्यकीय उपचारांच्या पलीकडे सर्वांगीण आरोग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी रुग्णांनी प्रतिबंधात्मक काळ...