Skip to main content

Posts

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

प्रोबायोटिक औषधे

  B log No.2024/035.  Date: -20 th , February,2024.   मित्रांनो,             कधी कधी माझ्या एका ब्लॉगवरुन मला दूसरा ब्लॉग लिहिण्याची संधी चालून येते.ती अशी की एखाद्या वाचकाने माझ्या ब्लॉगवरील प्रतिक्रियेमद्धे काही असे काही लिहिलेले किंवा सुचविलेले असते की मला त्या विषयावर ब्लॉग लिहिणे क्रमप्राप्त होऊन जाते.मी जो ब्लॉग लिहिला होता तो म्हणजे “आधुनिक जीवनशैलीचा आतडयावर होणारा परिणाम, ज्यांनी हा ब्लॉग वाचला नसेल, त्यांच्या साठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करा आणि  तो ब्लॉग वाचा आणि मग आजचा ब्लॉग वाचा .   सविस्तर            प्रोबायोटिक औषध म्हणजे सजीव फायदेकारक बॅक्टेरिया आणि यीस्ट असलेली पूरके किंवा औषधे , ज्यांचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्यावर आरोग्यविषयक फायदा होतो असे मानले जाते.हे सूक्ष्मजीव मानवी आतड्यात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या लाभदायक जीवाणूंसारखेच असतात आणि ते पचनसंस्थेतील लाभदायक जीवाणूंचे संतुलन राखण्यात किंवा पुनर्संचयित करण्यास मदत करतात.प्...

आधुनिक जीवनशैलीचा आतड्यांवर होणारा परिणाम

  B log No.2024/03 4 .  Date: - 19 th , February,2024.   मित्रांनो ,             आपण त्या युगाकडे चाललो आहोत,जिथे पिझ्झाची delivery ड्रोन करतो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी मेंदूचे काम करण्याचा प्रयत्न करत आहे.पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या शरीरासाठी म्हणा अगदी पोटासाठी आपण सारे करत असतो.त्या पोटातील आतड्यांची आपण काळजी घेतांना दिसत नाही.किंबहुना त्याबाबतीत आपण आजही अगदी अश्मयुगात आहोत असे लक्षात येते. या विषयी वाचा आजच्या ब्लॉगमध्ये.   सविस्तर    आजचा आधुनिक आहार हाच केवळ आमच्या पचनसंस्थेचा नाश करत नाही तर , अँटिबायोटिक्स , कीटकनाशके आणि तणाव यासारखे इतर अनेक घटक आहेत.जे आतड्याच्या आरोग्यावर परिणाम करतात. आता आपण आहार ,प्रतिजैविके, कीटकनाशके आणि तणाव या बद्दल सविस्तर जाणून घेऊ या.  1. आहार आपण सारेच जाणता की प्रक्रिया केलेले पदार्थ आतड्यांसाठी चांगले नाहीत.पण  गहू , सोया आणि कॉर्न यासारखी पिके शेतकऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर आहेत , म्हणून यापासून बनणारी उत्पादने ग्राहकांसाठ...

कर्ण मधुर संगीताचा जनक संगीतकार खय्याम

  B log No.2024/03 3 .  Date: - 18 th , February,2024.   मित्रांनो,             “दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिये” हे गाणे म्हटले की जशा आशा भोसले डोळ्यासमोर उभ्या रहातात. तसंच एक नांव आठवल्याशिवाय रहात नाही, ते म्हणजे संगीतकार खय्याम. आपल्या कर्णमधुर संगीताने ज्यांनी लोकांची मनं जिंकली त्या खय्याम यांची आज 97 वी जयंती. आजचा हा ब्लॉग त्यांना समर्पित.      सविस्तर      मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी यांचा जन्म एका पंजाबी मुस्लिम कुटुंबात १८ फेब्रुवारी १९२७ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबातील राहोन या गांवी झाला.ते लहानपणी नवी दिल्लीत आपल्या मामाच्या घरी पळून गेले. तेथे त्यांना शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित अमरनाथ यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले. करिअर चित्रपटांतील भूमिकांच्या शोधात खय्याम लाहोरला गेले. तेथे त्यांचा पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिश्ती यांच्याशी परिचय झाला. त्यांनी चिश्ती यांच्या रचनेचा पहिला भाग गायला. प्रभावित होऊन चिश्ती यांनी त्यांना सहाय्यक म्हणून सामील होण्...