ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
B log No.2024/035. Date: -20 th , February,2024. मित्रांनो, कधी कधी माझ्या एका ब्लॉगवरुन मला दूसरा ब्लॉग लिहिण्याची संधी चालून येते.ती अशी की एखाद्या वाचकाने माझ्या ब्लॉगवरील प्रतिक्रियेमद्धे काही असे काही लिहिलेले किंवा सुचविलेले असते की मला त्या विषयावर ब्लॉग लिहिणे क्रमप्राप्त होऊन जाते.मी जो ब्लॉग लिहिला होता तो म्हणजे “आधुनिक जीवनशैलीचा आतडयावर होणारा परिणाम, ज्यांनी हा ब्लॉग वाचला नसेल, त्यांच्या साठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करा आणि तो ब्लॉग वाचा आणि मग आजचा ब्लॉग वाचा . सविस्तर प्रोबायोटिक औषध म्हणजे सजीव फायदेकारक बॅक्टेरिया आणि यीस्ट असलेली पूरके किंवा औषधे , ज्यांचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्यावर आरोग्यविषयक फायदा होतो असे मानले जाते.हे सूक्ष्मजीव मानवी आतड्यात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या लाभदायक जीवाणूंसारखेच असतात आणि ते पचनसंस्थेतील लाभदायक जीवाणूंचे संतुलन राखण्यात किंवा पुनर्संचयित करण्यास मदत करतात.प्...