ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
Blog No. 2023/163 Date: 25 th , June 2023. मित्रांनो आज कालच्या जगात लोकांना प्रेरणा देणं,प्रोत्साहन देणं हे सुद्धा बऱ्याच लोकांचे करिअर झाले आहे.याला कारण जीवनात अनेक कारणांनी येणारी निराशा, वैफल्य. खरं तरं निराशा किंवा वैफल्य यायची कारणे अनेक आहेत. काही अगदी सामान्य कारणे देखिल असतात. कदाचित जीवनापासून आपल्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. किंवा सध्याची जी व्यवस्था आहे, तिला तोंड देण्यास किंवा सामोरे जाण्यास आपण कमी पडतो,सक्षम नाही आहोत.पण एकंदरीत, motivational speaker ना महत्व आले आहे किंवा आपणच ते प्रदान केले आहे.आज आपण एक अशीच गोष्ट बघणार आहोत.ती जीवनाकडे बघायला शिकवते. आपला ईको स्वतः निवडा एकदा एक माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन गावाजवळच्या जंगलात फिरायला ग...