Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

कविता संग्रह वाचन

कविता संग्रह आजकाल  कुणी वाचत की नाही  माहित नाही.  पण मी आज वाचून काढला. ज्याचे नांव आहे "तुझे गीत गाण्यासाठी". सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगांवकर यांचा हा कविता संग्रह. कवितेचे रूप ,स्वरूप आणि अंतरंग वेगवेगळे असते.  या कवितासंग्रहात एकूण 104 कविता आहेत. यातील 30 कवितांना माझ्या माहिती प्रमाणे स्वरसाज चढवून त्यांचे गाण्यांत रूपांतर करण्यांत आले आहे. ही गाणी बहुतेक सर्वांना माहित आहे.  "तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे या" गीताने त्यांनी कविता संग्रहाची सुरूवात केली आहे. हे गाणे सुधीर फडकेंनी अजरामर केले. तर "माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे" या पं. जितेंद्र अभिषेकीनी गाईलेल्या गीताने समारोप. पाडगांवकरांचे वैशिष्ठ हे की त्यांनी प्रेम गीत असो, विराणी असो. भक्तीगीत वा गझल वा युगुल गीत असो  सर्वाना न्याय दिला. कवितेच्या कुठल्याही प्रकारात त्यांचे शब्द कमी पडले नाहीत यातच त्यांचे मोठेपण जाणवते. या कविता संग्रहात "श्रावणांत घननिळा मध्ये एका कडव्यांत पाडगांवकर म्हणतात 'गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा' किंवा 'लाजून हासणे अन् हासून ते पहाणे...