Skip to main content

Posts

इन्सुलिन हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक (Hormone)

  ब्लॉग नं. 2026/09 4 . दिनांक: 4 एप्रिल,2026. मित्रांनो, इन्सुलिन हे शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक ( Hormone) असून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते. आज या विषयाची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमधून करुन घेणार आहोत. सविस्तरः इन्सुलिन : शरीरातील रक्तातील साखरेचा ' रक्षक ' आहे. आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी अन्नाची गरज असते. आपण जे अन्न खातो , त्याचे रूपांतर साखरेत (ग्लुकोज) होते. पण ही साखर पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी एका खास ' चावी ' ची गरज असते , ती चावी म्हणजे इन्सुलिन. 1.  इन्सुलिन म्हणजे काय ? (What is Insulin?) इन्सुलिन हे प्रथिनांनी बनलेले एक संप्रेरक आहे. शरीरातील साखरेचा वापर ऊर्जेसाठी करणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे हे याचे मुख्य काम आहे. 2.  इन्सुलिन शरीरात कसे तयार होते ? (How it Secretes?) *  स्वादुपिंड ( Pancreas):  आपल्या पोटाच्या मागे स्वादुपिंड नावाचा अवयव असतो. या स्वादुपिंडात ' आयलेट्स ऑफ लॅन्गरहॅन्स ' (Islets of Langerhans) नावाचे पेशीसमूह असतात. * बीटा पेशी ( Beta Cells ): या द...

उन्हाळ्यात स्वतःचे रक्षण कसे कराल?

ब्लॉग नं. 2026/0 88 . दिनांक:  29  मार्च , 2026.  मित्रांनो, ☀️ उन्हाळ्याच्या झळांपासून स्वतःला वाचवा: उहाळा सुरू झाला,प्रत्येक ऋतुच्या काही चांगल्या गोष्टी आहेत,तशाच काही त्रासदायक गोष्टी.लहानपणचे उन्हाळ्याचे दिवस काही वेगळेच असायचे. त्या वेळेस चांगली दोन महिन्यांची सुट्टी असायची.एवढा रखरखीत उन्हाळा नसायचा किंवा जाणवत नसेल. पण उन्हाळा हा सगळ्यात चांगला ऋतु वाटत असे.आजकाल मुलांना मार्चमध्ये परीक्षा झाली की,एप्रिलमध्ये पुढच्या वर्गाची शाळा आणि मेमध्ये सुट्टी.आणि जूनपासून पुन्हा शाळा सुरू.नैसर्गिक उपाय आणि आरोग्यदायी आहार यांच्या आधारे उन्हाळ्यापासून स्वतःला वाचवा.आजच्या ब्लॉगमधे यासाठीचे उपाय आपण सविस्तर जाणून घेऊ . सविस्तरः उन्हाळा सुरू झाला की , वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागतो. डिहायड्रेशन (पाणी कमी होणे) , पित्त वाढणे आणि अस्वस्थता जाणवणे , या समस्या सामान्य होतात. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली नाही , तर उष्णतेचे अनेक गंभीर विकार जडू शकतात. आजच्या या ब्लॉगमधे आपण पाहणार आहोत की , नैसर्गिक पद्धतीने शरीर थंड कसे ठेवायचे आणि ...

भारतीय मधुमेही आहार तक्ता

  ब्लॉग नं. 2026/0 87 . दिनांक:  28 मार्च , 2026. मित्रांनो, भारतीय मधुमेही आहार तक्ता: मधुमेहाचे ( Diabetes) नाव काढले की,अनेकदा डोळ्यासमोर येतात ते कडक नियम , बेचव जेवण आणि आवडीच्या पदार्थांचा त्याग.पण खरं सांगायचं तर , रक्तातील साखर सुधारण्यासाठी तुम्हाला खूप कठोर उपायांची गरज नसते.एका दिवशी ओट्स खाणे आणि दुसऱ्या दिवशी भात पूर्णपणे बंद करणे , अशा गोंधळात पडण्यापेक्षा एक स्पष्ट आणि शाश्वत आहार योजना असणे केव्हाही चांगले. हा ब्लॉग तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय खावे आणि कसे खावे , याचे सोपे मार्गदर्शन करेल. सविस्तर: मधुमेहासाठी आहार तक्ता का महत्त्वाचा आहे ? जेव्हा आपण प्रक्रिया केलेले कर्बोदके ( Processed Carbs) जास्त खातो किंवा दोन जेवणांमध्ये खूप मोठे अंतर ठेवतो , तेव्हा रक्तातील साखर वेगाने वाढते. एक सुनियोजित आहार तक्ता: ·         जेवण समान अंतराने विभागण्यास मदत करतो. ·         कर्बोदकांसोबत प्रथिने ( Proteins) आणि फायबरची जोड देतो. ·      ...

साबुदाणा: उपवासासाठी वरदान की आरोग्यासाठी शाप?

  ब्लॉग नं. 2026/086. दिनांकः 27 मार्च , 2026 मित्रांनो ,  साबुदाणा: उपवासासाठी वरदान की आरोग्यासाठी शाप ? भारतात सण-उत्सव आणि उपवास यांचे एक अतूट नाते आहे.नवरात्री असो वा आषाढी एकादशी , उपवासाचा पदार्थ म्हटलं की,आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे ' साबुदाणा ' . साबुदाण्याची खिचडी किंवा वडा खायला कोणाला आवडत नाही ? तो चवीला छान असतो आणि शरीराला त्वरित ऊर्जा देतो , हे जरी खरे असले तरी , याचे अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी ' सायलेंट किलर ' ठरू शकते.कसे ते माहित करून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर:    विशेषतः सलग नऊ दिवस किंवा वारंवार उपवास करताना,साबुदाण्यावर ताव मारणे महागात पडू शकते. चला तर मग , साबुदाण्याचे 4  प्रमुख दुष्परिणाम जाणून घेऊया. 1 . पचनसंस्थेवरचा ताण ( Digestive Issues) : साबुदाण्यामध्ये ' स्टार्च ' चे (पिष्टमय पदार्थ) प्रमाण अत्यंत जास्त असते. हे पिष्टमय पदार्थ पचायला जड असतात. जर तुम्ही साबुदाण्याचे अतिसेवन केले , तर खालील समस्या उद्भवू शकतात.जसे की, पोट फुगणे आणि गॅस होणे, अपचन आणि बद्धकोष्ठता तसेच पचनसंस्था कमकुवत असलेल्या ...

आरोग्याची गुरुकिल्ली: तुमचे शरीर की तुमचे विचार?

  ब्लॉग नं. 2026/085. दिनांकः 26 मार्च , 2026.    मित्रांनो ,  आरोग्याची गुरुकिल्ली: तुमचे शरीर की तुमचे विचार ? आपण आजारी का पडतो ? याचं उत्तर शोधायला गेलो तर,आपण जंतू , हवामान किंवा खाण्यापिण्याकडे बोट दाखवतो. पण कधी विचार केलाय का की , या सगळ्याच्या मागे आपलं ' अज्ञ मन ' (Subconscious Mind) असू शकतं ? याबद्दल आपण जाणून घेऊया आजच्या ब्लॉगमधे. सविस्तरः आजच्या धावपळीच्या जगात,आपण शरीराच्या व्याधींवर हजारो रुपये खर्च करतो . पण मनाच्या व्याधींकडे दुर्लक्ष करतो. चला तर मग , आज जाणून घेऊया शरीर आणि मन यांच्यातील हे अनोखे नाते. 1. नैसर्गिक शक्तीवर विश्वास ठेवा: माणूस पाण्यात का बुडतो ? कारण त्याच्या मनाने घट्ट स्वीकारलेलं असतं की,मला पोहता येत नाही. याउलट , हत्ती किंवा सापाला कोणी पोहायला शिकवत नाही , तरीही ते उत्तम पोहतात.कारण त्यांना स्वतःच्या नैसर्गिक शक्तीवर शंका नसते.आपल्या शरीरातही ' रोगप्रतिकारशक्ती ' नावाचा एक नैसर्गिक डॉक्टर,चोवीस तास काम करत असतो.जेव्हा आपण छोट्या आजारांसाठी लगेच औषधांचा भडिमार करतो , तेव्हा आपण खरं तर आपल्या शरीरावर अत्याचार करत अ...

पाणी पिण्याची 'H3 पद्धत

  ब्लॉग नं. 2026/084. दिनांक: 25 मार्च , 2026. मित्रांनो, रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा सर्वात सोपा उपाय: पाणी पिण्याची 'H3 पद्धत ' मधुमेह ( Diabetes) म्हटलं की,आपल्या डोळ्यासमोर येतात त्या कडू गोळ्या , इन्सुलिनची इंजेक्शनं आणि न संपणारी पथ्यं.पण तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्या रक्तातील साखर ( Blood Sugar) नियंत्रित ठेवण्यासाठी आणि इन्सुलिनची कार्यक्षमता 40 % पर्यंत वाढवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी साधन तुमच्या घरातच उपलब्ध आहे— आणि ते म्हणजे ' पाणी '. अधिक जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर:   ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढत्या वयानुसार तहान लागण्याची जाणीव कमी होते. शरीर आतून कोरडे पडलेले असते , पण मेंदूला त्याची जाणीव होत नाही. अशा वेळी रक्तातील साखर अचानक वाढणे किंवा सकाळी उठल्यावर साखर जास्त असणे ( Morning Spike) ,अशा समस्या उद्भवतात. यावर उपाय म्हणून डॉ. विल्यम्स थॉम्पसन यांनी 'H3 पद्धत ' सुचवली आहे. काय आहे ही 'H3 पद्धत '? H3 मधील 'H' म्हणजे Hydration ( हायड्रेशन). पहिले '3' म्हणजे दिवसातील 3 महत्त्वाच्या वेळा आणि दुसर...