ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
ब्लॉग नं :2025/34 3 . दिनांक : 7 डिसेंबर, 2025. ब्लॉग नं :2025/34 3 . दिनांक : 7 डिसेंबर, 2025. मित्रांनो , 🧠 तुमचा मेंदू पुन्हा तरुण करा: मेंदूच्या पेशी वाढवणारे 3 सोपे वैज्ञानिक व्यायाम करा पूर्वी शास्त्रज्ञांना असे वाटत होते की एकदा आपण मोठे झालो की आपल्या मेंदूत नवीन पेशी तयार होत नाहीत. पण आता हे मत पूर्णपणे बदलले आहे.आजचे आधुनिक संशोधन सांगते की मोठ्या वयातही आपल्या मेंदूत नवीन पेशी तयार होत राहतात , विशेषतः हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात. हा भाग स्मरणशक्ती , शिकण्याची क्षमता आणि भावना यांच्याशी जोडलेला असतो. आजचा ब्लॉग या विषयावर आहे. सविस्तर: ऑरेलियस इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सचे डॉ. अश्विन माथूर सांगतात की, 👉 “ आपली जीवनशैली मेंदूच्या पेशींच्या वाढीत खूप मोठी भूमिका बजावते.” आपण जसे विचार करतो , जसे वागतो , त्याचे संकेत मेंदूला मिळत राहतात. हे संकेत जितके चांगले असतील , तितका मेंदू अधिक मजबूत बनतो.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदू सशक्त ठेवण्यासाठी नेहमी औषधांची गरज नसते. नियमित व्यायाम हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. ✅ मेंदूच्या पेशी वाढव...