ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing ) आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...
ब्लॉग नं: 2025/265. दिनांकः 22 सप्टेबर , 2025. मित्रांनो , : मधुमेह आणि डोळ्यांचे आरोग्य: जाणून घ्या डायबेटिक रेटिनोपॅथीबद्दल : आपल्या डोळ्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. डोळ्याच्या गोळ्याला तीन महत्त्वाचे थर असतात – · सर्वात बाहेरील थर म्हणजे तंतुमय थर ( Fibrous Layer ) ज्यात स्क्लेरा आणि कॉर्निया यांचा समावेश होतो. · मध्यभागीचा थर म्हणजे रक्तवाहिन्यांचा थर ( Uveal Layer ) जो युरिया नावाने ओळखला जातो. · सर्वात आतला थर म्हणजे मज्जातंतूंचा थर , ज्याला रेटिना म्हणतात. रेटिनामध्ये प्रकाश-संवेदनशील पेशी असतात , ज्या आपल्याला दृष्टी देण्यासाठी आवश्यक आहेत. डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी रेटिनाचे कार्य महत्त्वाचे असते. परंतु मधुमेहाच्या गुंतागुंतीमुळे या थरावर परिणाम होतो आणि डायबेटिक रेटिनोपॅथी # Diabetes Ratinopathy नावाचा आजार उद्भवतो. डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय ? डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे,मधुमेहामुळे रेटिनामध्ये होणारे बद...