ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
Blog No 2024/250 . दिनांक : 22 , ऑक्टोबर , 2024 मित्रांनो, तुम्हाला कदाचित आठवत असेल की,स्वयंपाकघरात जे प्लॅस्टिकचे डब्बे आपण टिकाऊ आहेत म्हणून आणि जरी थोडे महाग असले तरी वापरत होतो,ते म्हणजे टपरवेअर कंपनीचे डब्बे असतं. एवढ्यात मात्र हे नांव ऐकू येईनासे झाले. कारण डबे , बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर ; कारण काय ? या कंपनीचे नक्की काय चुकले ? हे आपण जाणून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: टपरवेअर कंपनीचा एकतरी डब्बा (कंटेनर) प्रत्येकाच्या घरी मिळेलच. हे नाव आपल्या अगदी परिचयाचे आहे.अन्नासाठी सगळ्यात सुरक्षित प्लास्टिक म्हटलं तर टपरवेअरचे नावच आधी यायचे. घटती विक्री आणि वाढती स्पर्धा यामुळे ‘टपरवेअर ब्रॅंड कॉर्प’ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. फूड स्टोरेज कंटेनर फर्मने यापूर्वीही दिवाळखोरीचा इशारा दिला होता.मात्र , कंपनीवर ही वेळ का आली ? कंपनीचे नक्की काय चुकले ? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ. टपरवेअरची स्थापना टपरवेअरची स्थापना 1946 मध्ये केमिस्ट अर्ल टपर यांनी ...