ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
आज बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलो होतो.15 दिवस झाले,पाऊस स्वतः उसंत घेत नव्हता आणि आपल्याला उसंत घेऊ देत नव्हता. घरात बसून बसून कंटाळलेले मन,म्हटलं बाहेर पडलो तर ताजेतवाने होईल,प्रसन्न वाटेल. आपलं कसं असतं, आपण पाऊस नाही आला तरी परेशान असतो आणि तो आला तरी. रस्त्याने चालू लागलो.बाजूच्या धरणीने हिरवा अंगरखा पांघरला होता.जणू पावसाच्या आगमनाने ती खुष होऊन तिने नवे वस्त्र परिधान केले होते. झाडे हिरव्या हिरव्या पानाने हिरवीकंच दिसत होती. निसर्गाकडे कुठला कुंचा आहे माहित नाही. प्रत्येक हिरवा रंग दुसऱ्या पेक्षा वेगळा भासतो.एकही झाड निशपर्ण नव्हते. किती छान वाटत होतं. मैदानात एका ठिकाणी पाणी साचल होतं,आपण डबक म्हणतो त्याला. पण त्याच पाण्यात चिमण्या,मैना, बुलबुल सारखे आणि इतर कधीही दृष्टीस न पडणारे छोटे छोटे पक्षी विहार करीत होते.अंगावर पाणी घेऊन ते पंखांनी झटकून आपले पंख वाळवत होते.कुतहुल म्हणून तिथेच थोडा वेळ उभा राहिलो. ते इतक्या मिनिटांत आज इतके चालले तर एवढ्या calories कमी होतात,हे बाजूला ठेऊन.कारण इतर दिवशी ते सर्व पूर्ण करता येईल हो,पण हे सुख नेहमी मिळेल असं नाही...