ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
ब्लॉग नं: 2025/059 दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025. मित्रांनो: बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत. अति-विचार म्हणजे काय ? आणि तो कसा थांबवावा ? अति-विचार म्हणजे काय ? अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे , ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त ...