ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो , जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1. तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....
ब्लॉग सं. 2025/14 3 दिनांकः 2 4 मे , 2025. मित्रांनो , रोज चालणे तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो.विशेषतः वयानुसार.हृदयासाठी , रक्ताभिसरणासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी चालणे उत्कृष्ट आहे.पण तुम्हाला माहीत आहे कां? की फक्त चालण्यामुळेच,साठी नंतर तुमची स्नायूंची ताकद कमी होते आणि स्नायूंची घसरण होऊ शकते ? खरं तर , फक्त चालण्यावर विसंबून राहिल्याने,स्नायू कमजोर होणे , दररोज पाय दुखणे आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात , ज्या सामान्यतः वयामुळे होत असल्याचे मानले जाते.पण हे का घडते? आणि तुमची ताकद व स्वातंत्र्य कसे टिकवायचे? ते जाणून घेऊ या,आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: वयाची साठी उलटल्यानंतर,आता फक्त चालणे हाच व्यायाम आपण करू शकतो,हा गोड गैरसमज आपल्याला होतो.कारण चालणे,हा हलकासा व्यायाम आहे,ज्यासाठी फारसा स्नायूंचा प्रयोग करावा लागत नाही. हृदयासाठी हा व्यायाम प्रकार उत्कृष्ट असला तरी , तो स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी पुरेसा नाही.कालांतराने , त्यामुळे काही समस्या जाणवू लागतात. जसे की ; 1.पाय रोड होणे, 2.शरीराचा आकार गमावणे, 3.पाठीच्या स्नायूंमध्ये क...