Skip to main content

हृदयात ब्लॉकेज झाले आहेत?

ब्लॉग नं. 2025/15 6 दिनांक :- 6 जून ,  2025.   मित्रांनो , तुमच्या हृदयात काहीतरी बिघाड झाला की , ते तुम्हाला लगेच कळेल असा एक लोकप्रिय समज आहे.   पण हे खरे नाही.तज्ञांच्या मते , हृदयाच्या सर्व समस्या,बिघाड झाल्याचे स्पष्ट इशारा देणाऱ्या चिन्हे देत नाहीत. हृदयाची काही लक्षणे तुमच्या छातीतही दिसून येत नाहीत आणि काय चालले आहे हे सांगणे नेहमीच सोपे नसते. आजचा ब्लॉग या विषयावर आहे. सविस्तर: जर असं असेल तर मग हृदयात ब्लॉकेज झाले आहेत,हे आधी कळून येत नाही कां?नाही तसं नाही,           डॉक्टर म्हणतात की,जर तुम्ही ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल , लठ्ठ असाल आणि जास्त वजन असेल आणि तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब असेल तर हे खरे असू शकते. हृदयात ब्लॉकेज असल्याची सुरुवातीची काही लक्षणे डॉक्टरांनी सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे;     हृदयाच्या ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे: जर तुम्हाला वेदना , घट्टपणा किंवा छातीत दाब जाणवत असेल.तर हे हृदयाच्या धोक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे.जर तुमची धमनी ब्लॉक झाली असेल किंवा तुम्हाला हृदयवि...

विटामिन D ची कमतरता घातक

ब्लॉग नं.2025/153

दिनांक: 3 मे, 2025.

मित्रांनो,

सध्याच्या जीवनशैलीत व्हिटामीन डी ची कमतरता सामान्य झाली आहे.सतत टेन्शन येणे, डिप्रेशनमध्ये जाणे, कंबरदुखी, पाठदुखी किंवा मसल्स क्रॅम्प्स येणे ही लक्षणे दिसली तर तुमच्या शरीरात व्हिटामीन डी कमी आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे.कारण व्हिटामीन-D ची कमतरता शरीराला आतून पोकळ बनवते; यासाठी काय खायला हवे, हे आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.

सविस्तर:

व्हिटामीन डी का महत्त्वाचे?

व्हिटामीन डी केवळ हाडांसाठीच नाही,तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी च्या अहवालानुसार, या व्हिटामीनच्या अभावामुळे मानसिक स्थितीवर परिणाम होतो, आणि डिप्रेशन होण्याची शक्यता वाढते.जर तुम्हाला उन्हात जाणे शक्य नसेल, तर काही खाद्यपदार्थांच्या मदतीने तुम्ही व्हिटामीन डी ची पूर्तता करू शकता. तज्ञांच्या मते, व्हिटामीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.त्याआधी व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे,शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात.हे आपण पाहू या.   

1. हाडांची समस्या:

·        हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस किंवा रिकेट्स होण्याची शक्यता वाढते.

·        हाडं ठिसूळ होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

2. मसल्स क्रॅम्प्स आणि कमजोरी:

·        स्नायूंमध्ये कमकुवतपणा आणि क्रॅम्प्स जाणवतात.

·        शरीरात सतत थकवा जाणवतो, जरी कमी शारीरिक मेहनत घेतली तरी.

3. प्रतिकारशक्ती कमी होते:

·        शरीराची रोगप्रतिकारशक्ती घटते, ज्यामुळे सर्दी, खोकला, आणि इतर संसर्गांचा धोका वाढतो.

4. मानसिक आरोग्यावर परिणाम:

·        डिप्रेशन किंवा सतत उदासीनता येते.

·        चिडचिडेपणा आणि एकाग्रतेत अडथळा जाणवतो.

5. हृदयाशी संबंधित समस्या:

·        व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

·        हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते.

6. मधुमेहाचा धोका:

·        शरीरातील इंसुलिनची संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

7. त्वचेवर परिणाम:

·        त्वचेमध्ये कोरडेपणा आणि डाग निर्माण होऊ शकतात.

8. लहान मुलांमध्ये विकासाअडथळा:

·        मुलांच्या हाडांचा विकास योग्य प्रकारे होत नाही.

·        दातांमध्ये समस्या होऊ शकतात.

यासाठी कोणते पदार्थ खावेत हे आपण बघू या.

व्हिटामीन डी युक्त 5 पदार्थ:

1.       मशरूम:
मशरूम हा व्हिटामीन डी चा उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. यामध्ये आवश्यक मिनरल्सही भरपूर प्रमाणात असतात. मशरूमची भाजी, सूप किंवा सॅण्डविचमध्ये मशरूमचा समावेश करा.

2.       फोर्टिफाईड फूड्स:

दूध, संत्र्याचा रस, प्लांट-बेस्ड दूध (बदाम आणि सोया मिल्क), आणि सेरेल्स यासारख्या फोर्टिफाईड फूड्समधून व्हिटामीन डी सहज मिळू शकते.

3.       कॉड लिव्हर ऑईल:

कॉड लिव्हर ऑईल हे व्हिटामीन डी चा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि व्हिटामीन ए ही आहेत. सप्लिमेंट्सच्या स्वरूपातही याचा उपयोग करता येतो.

4.       पनीर आणि दुग्धजन्य पदार्थ:

पनीरमधून व्हिटामीन डी आणि प्रोटीन मिळते. याशिवाय दही, तूप आणि दलिया यांचा आहारात समावेश करून हाडे मजबूत ठेवता येतात.

5.       गाईचे दूध आणि तूप:

गाईचे दूध आणि तूप हे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. लहान मुलांची हाडे मजबूत करण्यासाठी त्यांच्या आहारात दही, लोणी आणि तुपाचा समावेश करा.

समारोप :

जर तुमच्या शरीरात व्हिटामीन डी ची तीव्र कमतरता जाणवत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या. निरोगी शरीरासाठी योग्य आहार, सूर्यप्रकाश आणि व्यायाम या गोष्टींचा समतोल साधणे खूप महत्त्वाचे आहे.आरोग्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका आणि व्हिटामीन डी युक्त जीवनशैलीचा स्वीकार करा.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा. पुन्हा भेटुया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा, आनंदाने जागे व्हा.  

 

 प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...