ब्लॉग नं. 2026/144. दिनांक: 24 मे, 2026. मित्रांनो, काही दिवसांपासून , भारतीय रुपयाच्या ( INR) घसरत्या मूल्याबाबत,सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत,रुपया विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे , चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पण हा प्रश्न केवळ भारतापुरताच मर्यादित आहे का ? की जागतिक अर्थकारणाचा हा एक भाग आहे ? हे समजून घेण्यासाठी , आपण 2012 मधील आणि आजच्या ( 2026 मधील) , प्रमुख जागतिक चलनांच्या विनिमय दरांचा ( Exchange Rates), आजच्या ब्लॉगमध्ये एक तुलनात्मक अभ्यास करूया आणि रुपयावर पडलेल्या ताणाची वास्तविक कारणे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सविस्तर: गेल्या तीन चार महिन्यांपासून चाललेल्या आखातातील संघर्षाचा,परिणाम म्हणादुष्परिणाम म्हणा, केवळ भारतावर नाही तर जागतिक अर्थकारणावर याचा परिणाम झाला आहे.अर्थशास्त्रात इतर परिस्थिति समान असतांना , असं गृहीत धरून सिद्धांत मांडले गेले आहेत,जी परिस्थिति कधी समान असू शकत नाही.आणि आता ती फारच बिघडलेली आहे,ज...
ब्लॉग नं. 2026/13 8 . दिनांक: 1 8 मे, 2026. मित्रांनो, रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि ' कर्बोदके ': जाणून घ्या शास्त्रोक्त माहिती सर्वसाधारणपणे असे मानले जाते की , रक्तातील साखर वाढण्यास केवळ कर्बोदके ( Carbohydrates) जबाबदार असतात.यामुळे अनेकजण आपल्या आहारातून धान्य पूर्णपणे बंद करतात.पण तज्ज्ञांच्या मते , सर्वच कर्बोदके शरीरासाठी घातक नसतात.खरं तर , काही विशिष्ट कर्बोदके तुमच्या शरीराच्या विरोधात नव्हे , तर शरीरासोबत काम करतात.या बाबत अधिक माहिती जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: इन्सुलिन प्रतिरोध ( Insulin Resistance) म्हणजे काय ? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या मते , जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत , तेव्हा इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो.यामुळे ग्लुकोज रक्तप्रवाहात साचून राहते आणि स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन सोडावे लागते.एका सर्वेक्षणानुसार , 18 ते 44 वयोगटातील सुमारे 40 % अमेरिकन प्रौढांना ही समस्या जाणवते , ज्याची अनेकदा त्यांना जाणीवही नसते. संपूर्ण धान्ये इन्सुलिन प्रतिरोध सुधारण्यासाठ...